madhur bhandarkar cinema | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

कॉंग्रेसच्या विरोधामुळे नागपूरमध्ये भांडारकरांची पळापळ

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 जुलै 2017

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भांडारकर यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांना गाठून काळे फासण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर विमानताळ गाठले. परंतू, भांडारकर "चेक ईन' करून "व्हीआयपी लाऊंज' होते. तिथे प्रवाशांशिवाय इतरांना प्रवेश नसल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झाली. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, प्रशांत धवड यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ता उपस्थित होते. 

नागपूर : पुण्यापाठोपाठ नागपुरातही दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या "इंदू सरकार' या वादग्रस्त चित्रपटाला कॉंग्रेसतर्फे रविवारी (ता. 16) विरोध करण्यात आला. कॉंग्रेसने केलेल्या तीव्र विरोधामुळे भांडारकर यांना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजिण्यात आलेली पत्रपरिषद रद्द करून पळ काढावा लागला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लागलेल्या आणिबाणीवर टीका करणारा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. 

पुण्यात शनिवारी कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनला विरोध केला. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह चित्रपटातील काही कलावंतांना पत्रकारपरिषदस्थळी कोंडून ठेवले होते. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात "इंदू सरकार' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रपरिषद आयोजिण्यात आली होती. 
पत्रकारपरिषद सुरू होण्यापूर्वीच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव केला. यामुळे भांडारकर हे पत्रपरिषदस्थळी आलेच नाही. दरम्यान भांडारकर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे असल्याची माहिती मिळताच कॉंगेस कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. मात्र, भांडारकर वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पॉईंट गेल्याचे कळाले. तिथे विचारणा केली असता भांडारकर यांच्या नावाने चार खोल्या बूक असून ते तिथे आलेच नसल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापकाने दिली. 

यानंतरही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भांडारकर यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांना गाठून काळे फासण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर विमानताळ गाठले. परंतू, भांडारकर "चेक ईन' करून "व्हीआयपी लाऊंज' होते. तिथे प्रवाशांशिवाय इतरांना प्रवेश नसल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झाली. यावेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, प्रशांत धवड यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ता उपस्थित होते. 

"संघ, भाजपचे षडयंत्र' 
आणिबाणीच्या काळात संघावर लादण्यात आलेली बंदीसारख्या विषयावर टिप्पणी करण्यात आली आहे. तसेच आणिबाणीच्या काळात इंदिराजींनी घेतलेल्या काही निर्णयांना चुकीचे दाखवून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कॉंग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे. हा चित्रपट संघ आणि भाजपचे षडयंत्र असून भांडारकर यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा चित्रपट दाखवायला हवा. चित्रपटात काही आक्षेपार्ह नसेल तर कॉंग्रेसचा त्याला विरोध राहणार नाही. मात्र, तसे न करता भांडारकर यांनी दाखविलेला पळपुटेपणा त्यांच्या प्रामाणिकतेवर संशय निर्माण करणारा असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. तसेच चित्रपट ज्या टॉकीजमध्ये प्रदर्शित होईल त्या टॉकीजची खैर नाही, असा इशारा देखील दिला. 

पोलिसांनी दिली धमकी 
चित्रपटाविरुद्ध करण्यात आलेल्या आंदोलनानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट येथे चहा घेण्यास गेले. त्यावेळी पोलिसांनी "डिटेन' करण्याची धमकी दिली. पोलिसांच्या या कृतीचा शहर कॉंग्रेसने विरोध केला आहे. पोलिसांची भूमिका जनरल डायरप्रमाणे असल्याची टीकादेखील यावेळी कॉंग्रेसने केली. 

संबंधित लेख