madhukar pichad on bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

भाजप सरकार "चले जाव' : मधुकर पिचड 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थट्टा केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सरकार "चले जाव'चा नारा देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी सांगितले. 

नगर : सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थट्टा केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सरकार "चले जाव'चा नारा देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी सांगितले. 

निळवंडे धरणाच्या जलपुजन कार्यक्रमात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारच्या अडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे जीव जात आहेत. त्यांना वाचविण्यासाठी आता पुढे यावे लागेल. निळवंड्याचे श्रेय घेण्यावरून भांडणे सुरू आहेत. बाळासाहेब थोरात सोडले, तर कुणीही मदत करीत नाहीत. धरण भरल्यावर जसा आनंद होतो, तसाच ज्यांचे संसार त्यात बुडाले, तांच्या डोळे पुसण्याचे काम कोणी करीत नाही, असे पिचड म्हणाले. 
अकोले तालुक्‍यातील जनतेची जमीन धरणात गेली आहे. त्यामुळे त्या पाण्यावर हक्कही तालुक्‍यातील जनतेचा पहिला पाहिजे. आम्हाला पाणी न देता पळवून नेणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. आज जितक्‍या आनंदाने जलपूजन करतो, तितक्‍याच आक्रमकपणे आंदोलनही करू, असा इशारा पिचड यांनी दिला. 

संबंधित लेख