आजचा वाढदिवस : मधुकरराव चव्हाण, आमदार (कॉंग्रेस)-तुळजापूर 

आजचा वाढदिवस : मधुकरराव चव्हाण, आमदार (कॉंग्रेस)-तुळजापूर 

तुळजापूर तालुक्‍यात 1962 मध्ये लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात केली. तत्पूर्वी ते कापडाचा व्यवसाय करायचे. 1967 मध्ये काकंब्रा गणातून विजयी झालेले मधुकर चव्हाण तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती बनले होते. त्यानंतर 1972 मध्ये पंचायत समितीच्या सभापतिपदी त्यांची निवड झाली. नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष आणि तुळजापूर येथील कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. 1984 मध्ये कॉंग्रेसच्या वतीने उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली, मात्र त्यामध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1990, 1995, 1999, 2004 , 2009 आणि 2014 अशा सलग पाचवेळा मधुकर चव्हाण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडणूक लढले. पैकी 1995 मधील निवडणुकीचा अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणूकीत विजयी झाले. दरम्यानच्या कालावधीत राज्य सहकारी बॅंकेचे संचालक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले. सतत 11 वर्षे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून मधुकर चव्हाण कार्यरत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com