madhu chavan and mhada | Sarkarnama

मधू चव्हाणांना गावीच मिळे आनंदवार्ता

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांना पक्षाने म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. यापूर्वी ते पक्षाचे प्रवक्ते, आमदारही राहिले आहेत. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अशा नेत्याला मिळालेल्या संधीने त्यांच्या चाहत्यांना निश्‍चितपणे आनंद झाला असेल. 

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांना पक्षाने म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. यापूर्वी ते पक्षाचे प्रवक्ते, आमदारही राहिले आहेत. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अशा नेत्याला मिळालेल्या संधीने त्यांच्या चाहत्यांना निश्‍चितपणे आनंद झाला असेल. 

मधू चव्हाण हे संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आहेत. तसेच ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचेही कडवे समर्थक म्हणून ओळखले जात. पुढे तर या दोघांमध्ये अगदी टोकाचे मतभेद झाले होते. पक्षांतर्गत राजकारण पेटले होते. खरेतर मुंडे-चव्हाण हे एकमेकापासून काही काळ दूरही गेले होते. गेल्या अनेक वर्षापासून पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चव्हाण यांच्या खांद्यावर आता म्हाडाचे अध्यक्ष केले आहे. एका कार्यकर्त्यांना सन्मान करण्यात आला आहे. 

पुढे मुंडे यांची साथ सोडून ते नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकारण सुरू झाले. चव्हाण यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यानंतर मुंडे यांचा पारा अधिक चढला होता. चव्हाण यांच्या नियुक्तीला विरोध करताना त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यावेळी खरेतर मुंडे-महाजनांचे पक्षाच वर्चस्व होते. मुंबईचे अध्यक्षपद चव्हाण यांना लाभले नाही. मुंडेंच्या विरोधामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी दुसऱ्याच नेत्यांची निवड करण्यात आली होती. 

वास्तविक मुंडे-चव्हाण हे विद्यार्थी दशेपासूनच संघ परिवारात कार्यरत होते आणि संघाच्या विचारसरणीवर त्यांची निष्ठा होती. या दोघांमध्ये एकच फरक होता तो म्हणजे मुंडे यांना अफाट प्रसिद्ध मिळाली त्या तुलनेत चव्हाण मागे पडले. 

चव्हाण हे सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. चव्हाण आज साठ वर्षाचे आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी पक्षात विविध पदावर काम केले. 1995 मध्ये भाजप-शिवसेना युती जेव्हा सत्तेवर आली तेव्हा मधु चव्हाण प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते. बलाढ्य अशा कॉंग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यात भाजप-शिवसेनेला यश मिळाले होते. 2003 मध्ये ते भाजपचे प्रदेश प्रवक्ते होते तर पक्षाने त्यांना 2004 मध्ये विधान परिषदेवर पाठविले. संघ-भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाचे अध्यक्ष केले आहे. एका प्रामाणिक कार्यकर्त्याला मिळालेल्या संधीचे ते सोने करतील अशी आशा भाजप कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांना आहे. 

मधू चव्हाण हे भाजपचे जुन्या पिढीतले नेते. स्व.वसंतराव भागवत , प्रमोद महाजन अशा बिनीच्या शिलेदारांबरोबर त्यांनी काम केलेले. भाजपचे सरकार सत्तेत आले की चव्हाणांचे पक्षातले योगदान लक्षात घेता त्यांना महामंडळांवर काम करण्याची संधी मिळतेच. मुंबई भाजपचे अध्यक्षपद त्यांना भलेही लाभले नसेल सत्ता आली की ते पदाधिकारी होतातच. 

आता चव्हाण यांना म्हाडा हे सर्वात महत्वाचे महामंडळ देण्यात आले आहे. ही बातमी थडकली तेंव्हा चव्हाण मार्गताम्हाणे (जि. रत्नागिरी) या त्यांच्या गावी महाविदयालयाच्या बैठकांसाठी गेले होते. युती सरकारच्या कार्यकाळात त्यांना इमारत दुरुस्ती बोर्डावर नेमले गेले तेंव्हाही ते गावीच बैठक घेण्यासाठीच गेले होते. गाव त्यांना लाभते हेच खरे. 

संबंधित लेख