madha sadabhau khot bjp ticket | Sarkarnama

भाजपच्या चिन्हावर लढणार; फडणवीस सांगतील तो मतदारसंघ : सदाभाऊ खोत 

किरण चव्हाण 
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या कोणत्याही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उंदरगाव (ता. माढा) येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

माढा (सोलापूर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या कोणत्याही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उंदरगाव (ता. माढा) येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना ही राजकीय संघटना नाही. शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना आहे. आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस सांगतील तेथून माझ्यासह कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढतील. 

ते म्हणाले, सदाभाऊ खोतांची काही जणांना कावीळ झाली आहे. खा. राजू शेट्टींना विचाराची लढाई विचाराने लढता येत नाही. त्यांच्या विचार संपला आहे. त्यामुळे ते कासावीस झाले आहेत. त्यांचे पित्त खवळले आहे. पण मी कोणत्याही झुंडशाहीला घाबरणार नाही. ज्यांच्या विरोधात पंधरा वीस वर्षे संघर्ष केला. त्यांच्या हातात हात घालून त्यांच्या मांडीला मांडी लावून स्वाभिमानीचे नेतृत्व बसत असून त्यांचे गुणगाण गात आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रती आस्था राहिलेली नाही तर आपली खासदारकी कशी टिकेल आणि मीच कसा मोठा नेता आहे यासाठी त्यांची आता धडपड चालली आहे. 

संबंधित लेख