madanrao mohite about prithviraj chavhan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पृथ्वीराज चव्हाण यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांच्या गटाशी काडीमोड घेतला!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

दक्षिणला नव्या नेतृत्वाची गरज आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : नद्याजोड प्रकल्पाचे जनक म्हणविणाऱ्या माजी आमादारांसह कऱ्हाड दक्षिणचे विद्यमान आमदार, माजी मुख्यमंत्र्यांपासून जनतेने सावध रहावे. माजी मुख्यमंत्री खोटं बोलतात तर माजी आमदारांमुळे विकास खुंटला आहे, अशी टीका यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी केली. 

घोगाव (ता. कऱ्हाड) येथे भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण उंडाळे विभाग जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री. मोहिते बोलत होते. यावेळी विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, शिवाजीराव जाधव, धनाजी पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते उपस्थित होते. 

श्री. मोहिते म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांच्या गटाशी काडीमोड घेतला आहे. दक्षिणला नव्या नेतृत्वाची गरज आहे. भाऊ व आप्पा यांच्या दूरदृष्टीमुळे कृष्णाकाठ समृद्ध झाला. माणसांची सुधारणा होऊच नये, असे नेतृत्व लाभल्याने गेली 35 वर्षे उंडाळे खोऱ्याचा विकास खुंटीत झाला. नद्याजोड प्रकल्पाचे जनक म्हणवून घेणाऱ्यांनी भागात सुबत्ता आणली नाही, उंडाळे भागातील शेतकऱ्यांना वाकुर्डे योजनेचे पाणी कायमस्वरूपी मिळावे यासाठी अतुल भोसले यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.  

संबंधित लेख