madan bhosale supporter may get youth congress leadership in satara | Sarkarnama

मदन भोसलेंच्या समर्थकाला मिळणार साताऱ्यात `युवक`ची संधी

उमेश भांबरे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सातारा : काॅंग्रेस नेत्यांतील वाद युवक कॉंग्रेसमध्ये नको, अशी भूमिका घेत युवक कॉंग्रेसची निवडणुक बिनविरोध करण्याची तयारी नेत्यांनी सुरू केली आहे. यानिमित्ताने जिल्हा कॉंग्रेसमधील नेत्यांच्या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस "युवक'चे जिल्हाध्यक्षपद वाई तालुक्‍याला दिले जाणार आहे. 

सातारा : काॅंग्रेस नेत्यांतील वाद युवक कॉंग्रेसमध्ये नको, अशी भूमिका घेत युवक कॉंग्रेसची निवडणुक बिनविरोध करण्याची तयारी नेत्यांनी सुरू केली आहे. यानिमित्ताने जिल्हा कॉंग्रेसमधील नेत्यांच्या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस "युवक'चे जिल्हाध्यक्षपद वाई तालुक्‍याला दिले जाणार आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची जिल्ह्यात वाटचाल सुरू आहे. पण काही कारणांनी जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरेंमध्ये तात्विक वाद निर्माण झाले आहेत. यातून कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांतही दुफळी निर्माण झाली आहे.

युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत यावेळेस कोणत्याही नेत्यांच्या नातेवाईकांना संधी न देण्याची भुमिका सर्वांनी घेतली आहे. प्रत्येकाला आपापल्या अपेक्षेप्रमाणे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ठरविण्याची मुभा दिली आहे. युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करताना एकमेकांविरोधात अर्ज दाखल न करण्याची भूमिका नेते मंडळींनी घेतली आहे.

यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले यांनी आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला युवकमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युवक कॉंग्रेसची निवडणूक बिनविरोधच्या वाटेवर आहे.

काल (रविवारी) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यानंतर पाच ते सहा सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून एकुणच विरोधात अर्ज दाखल झालेले नसल्याने काही जागा बिनविरोध होणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी दोन अर्ज आहेत तेथील एकाला उमेदवाराला प्रदेशवर जाण्याची संधी मिळणार आहे. युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पद यावेळेस वाई तालुक्‍याला संधी दिली जाणार आहे. त्यानुसार नेते मंडळींनी तयारी केली आहे. यावेळेस मदन भोसले यांच्या समर्थकांतील युवकाला संधी मिळणार आहे.

जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोधच्या वाटेवर असली तरी उपाध्यक्ष पदासाठी एकापेक्षा अधिक जणांनी अर्ज दाखल केल्यास पुन्हा येथे जिल्हाध्यक्षाची अडचण होणार आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठीही एकच अर्ज दाखल व्हावा, यासाठी नेतेमंडळींनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

संबंधित लेख