maaratha youth not burn maharastra | Sarkarnama

मराठ्यांची पोरं कधीच महाराष्ट्र जाळणार नाही; उद्धव ठाकरेंना विश्वास 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

पुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यात केलेल्या आंदोलन पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत ते प्रथम मागे घ्यावेत, ज्या समाजकंठकांनी जाळपोळ केली त्यांच्यावर कारवाई करा असे सांगतानाच मराठ्यांची पोरं कधीच महाराष्ट्र जाळणार नाहीत असा विश्वास शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

मराठा समन्वय समितीच्या काही नेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजातील निर्दोष कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन दिल होते. मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही. सणासुदीच्या काळात या समाजातील मुलांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे थांबवावे. मराठा आंदोलनात ज्या समाजकंठकांनी जाळपोळ केली अशा गुन्हेगारांना शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार चालढकल करीत आहेत याकडे लक्ष वेधून ठाकरे म्हणाले, की शिवसेना मराठा समाजाच्या मागे भक्कमपणे उभा आहे. मराठा, धनगर समाजासह अन्य समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलवून विधिमंडळात झालेला ठराव केंद्राकडे पाठवावे आणि केंद्रानेही याबाबत तातडीने निर्णय घ्यावा असे ठाकरे म्हणाले.

संबंधित लेख