m j akbar file defamation file | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अकबर यांच्याकडून अब्रुनुकसानीची तक्रार दाखल 

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : "मी-टू' प्रकरणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली. ऍड. करंजवाला अँड कंपनी यांच्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे. 

देशभरात "मी-टू' मोहिमेंतर्गत अनेक महिलांनी पत्रकार आणि केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यापैकीच एक प्रिया रमाणी होत. यादरम्यान एम. जे. अकबर यांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात आरोप करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचे सूतोवाच केले. 

एम. जे. अकबर यांनी वृत्तपत्र आणि मासिकांचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. एम.जे.अकबर यांनी आपल्या अब्रुनुकसानीच्या तक्रारीत रमानी यांनी आपल्यावर चुकीचे, खोटे, अन्यायकारक आरोप केले असल्याचे म्हटले आहे. या आरोपामुळे प्रतिमा डागाळली गेली असल्याचे नमूद केले आहे. रमानी यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून ते आधारहीन असल्याचे नमूद केले आहे. या आरोपातून मानहानी करण्याचा प्रयत्न केला असून ही बाब मोठी अपमानास्पद आहे, असे एम.जे.अकबर यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख