#MeToo : अकबर देशात परतले,म्हणे,"" सर्व आरोपांना देणार उत्तर !'' 

#MeToo : अकबर देशात परतले,म्हणे,"" सर्व आरोपांना देणार उत्तर !'' 

नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर आज सकाळी परदेशवारी करून भारतात परतले आहेत. विमानतळावरुन बाहेर जाताना पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी याप्रकरणी लवकरच उत्तर देणार असल्याचे सांगितले असले तरी अकबर यांच्यावरील आरोपी चौकशी करण्याची तयारी भाजपने दाखविली आहे. 

#MeToo अभियानात काही महिलांकडून करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर अकबर अडचणीत आले आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही अप्रत्यक्षपणे अकबर यांच्यावर निशाना साधला आहे. त्यातच पक्षाध्यक्ष अमीत शहा यांनी चौकशी करण्याची तयारी दाखविल्याने अकबर मंत्रीपदावर राहणार की जाणार याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आज सकाळी परदेशातून परतलेल्या अकबर यांना तुम्ही राजीनामा देणार का ? असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. 

#MeToo अक्षरशः भडका उडाला आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर इंडस्ट्रीतील इतर अनेक स्त्रीयांना बोलण्याचे बळ मिळाले आणि त्यातील असंख्य स्त्रीयांनी समोर येऊन मोठमोठ्या कलाकार, दिग्दर्शक यांच्यावर तोफ डागली. त्यामध्ये इंडस्ट्रीतील काही मोठमोठे कलाकार समोर आले आहेत ज्यांची नावेही कोणाला अपेक्षित नव्हती. 

या मोहिमेत रोज नवनवीन नावे समोर येत. अभिनेत्री मंदाना करिमीनेही "क्‍या कुल है हम 3'चे दिग्दर्शक उमेश घाडगेने तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. मंदना म्हणते, क्‍या कुल है हम 3 च्या चित्रीकरणादरम्यान उमेश घाडगे आयत्यावेळी लास्ट मिनीट चेंजच्या नावाखाली माझ्या स्टेप्स बदलायचा, शूटिंगच्या खूपवेल आधी बोलवून घ्यायचा आणि जे माझ्या पोषाखात नाहीच आहेत असे कपडे मला घालायला सांगायचा, 

मला तासंतास शूटिंगसाठी वाट पाहायला लावायचा.' मंदानाने या तिच्या अनुभवामुळे अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला होता. पण नंतर ती पुन्हा या क्षेत्रात आली. तिने साजिद खान नेही हमशकल्स चित्रपटाच्या वेळी तिला फोन करून तुझा चित्रपट पाहिला. आम्हाला तुझी बॉडी पाहायची आहे, असे सांगितले तेवढ्यात तू विनाकपड्यात कशी दिसतेस ते पाहायचे आहे असे कोणीतरी पाठून एक व्यक्ती म्हणाल्याचे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com