Lucknow : Modi VS Yogi hoardings | Sarkarnama

लखनौत लागले होर्डिंग : जुमलेबाजी का नाम मोदी - हिंदुत्व का ब्रँड योगी

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

.

लखनौ :  मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले आहेत.

 उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने हे पोस्टर लावले असून, "योगींना आणा, देश वाचवा' असा संदेश त्यावर लिहिला आहे. या संघटनेने पुढच्यावर्षी 19 फेब्रुवारी रोजी धर्म संसदेचे आयोजन केले आहे.

"योगी आणा, देश वाचवा' या संदेशाच्या बाजूला #Yogi4PM हा हॅशटॅग दिला आहे. या पोस्टरमधून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. होर्डिंगवर नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो असून मोदींच्या फोटोखाली जुमलेबाजी का नाम मोदी आणि आदित्यनाथांच्या फोटोखाली हिंदुत्वका ब्रँड योगी  असे म्हंटलेले आहे . अमित जानी नावाच्या व्यक्तीने हे पोस्टर लावले आहेत.

दरम्यान अमित जानी याच्याविरुद्ध बदनामी आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण या कलमाखाली गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी हे होर्डिंगही जप्त केले आहे . 
 

संबंधित लेख