Lstray cows should be sent to BJP office : Laluprasad Yadav | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशमध्ये भाजप पुढे, भाजप - 108 कॉंग्रेस - 106
छत्तीसगढ विधानसभा - काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर

पाटण्यातल्या भाकड गाई  भाजप कार्यालयात बांधा  - लालूप्रसाद यादव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 मे 2017

पाटण्याच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या आणि म्हाताऱ्या गाई पकडून कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात नेऊन त्या बांधाव्यात, असे केल्यावर कुत्रे पाळण्याची सवय असलेल्या भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते ते कळेल. 

पाटणा: भाजपकडून सतत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संतापलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गाईंचा आधार घेतला आहे. म्हाताऱ्या आणि भाकड गाई भाजपच्या कार्यालयात नेऊन बांधा, असे आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. 

राजगीरमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपात ते बोलत होते. 

पाटण्याच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या आणि म्हाताऱ्या गाई पकडून कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात नेऊन त्या बांधाव्यात, असे केल्यावर कुत्रे पाळण्याची सवय असलेल्या भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते ते कळेल. या लोकांना गोरक्षकांच्या हवाली करायला हवे,  असे लालूप्रसाद म्हणाले. 

 गाईंच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना उघडे करण्याची वेळ आल्याचे सांगून लालूप्रसाद म्हणाले, की गाईंच्या नावाने फार काळ राजकारण करता येणार नाही. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या आश्‍वासनाचा भाजपला विसर पडला आहे. चारही पीठांच्या शंकराचार्यांच्या नियुक्तीतही आरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले  . 
 

संबंधित लेख