For Loksabha 6 seats and for assembly 9 seats distribution is critical : Chandrakant patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

युतीसाठी लोकसभेच्या 6 जागांचा तर  विधानसभेला  95 जागांचा तिढा : चंद्रकांतदादा 

सदानंद पाटील
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

288 पैकी सध्या युतीकडे 193 जागा आहेत. उर्वरित 95 जागाचे वाटप कसे करायचे, हा कळीचा मुद्दा आहे.

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :  "राज्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत ही चर्चा होणे अवघड आहे."

"लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपात काही अडचण नाही कारण तिथे फक्त 6 जागांचा प्रश्न आहे.  विधानसभेला मात्र 95 जागांचा मोठा तिढा आहे. आणि हा तिढा सोडवणे हे मोठे स्किल आहे. युती करायचीच असेल तर हा तिढाही सुटेल," असे सूचक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मंत्री पाटील म्हणाले, "  भाजप व मित्रपक्ष मिळून 130 जागा आहेत. तर शिवसेनेच्या 63 जागा आहेत. 288 पैकी सध्या युतीकडे 193 जागा आहेत. उर्वरित 95 जागाचे वाटप कसे करायचे, हा कळीचा मुद्दा आहे."

"कोणतीही युती होताना स्टॅंडिंग जागा ज्या त्या पक्षाला सोडण्यात येतात. तर उर्वरित जागांचा निर्णय हे त्या-त्या मतदारसंघातील परिस्थितीनुसार घेण्यात येतो.मात्र युती करायची नसेल तर स्टँडिंग जागावर दावेदारी केली जाते. त्यामुळे जर काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत येऊ द्यायचे नसेल तर युतीची चर्चा होईल," असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख