loklekha samiti | Sarkarnama

मनीषा म्हैसकर यांची लोकलेखा समितीसमोर  खरडपट्टी, शेकापचे जयंत पाटील भडकले 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 14 जून 2017

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध कामासाठीच्या ऑडिट रिपोर्टसंदर्भात लोकलेखा समितीसमोर मोघम उत्तरे देणाऱ्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची शेकापचे आमदार आणि या समितीचे सदस्य जयंत पाटील यांनी सुनावणीदरम्यान सर्वांसमोर खरडपट्टी काढली. एरवी सचिव म्हणून अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या म्हैसकर यांची लोकलेखा समितीच्या सदस्यांसमोर चांगलीच फजिती झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी 'सरकारनामा'ला सांगितले. 

विषय होता लोकलेखा समितीच्या सुनावणीचा. विधानभवनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नगरविकास विभागाच्या इतर विषयासह मुंबई महापालिकेच्या रस्ते, बांधकाम, आदी विषयातील कामात झालेला गैरकारभार आणि त्याविषयीच्या ऑडिट रिपोर्टवर समितीकडून नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव म्हणून मनीषा म्हैसकर यांची समितीकडून साक्ष घेण्यात येत होती. मात्र त्यावर समितीच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला म्हैसकर या मोघम उत्तरे देत होत्या, यामुळे समितीकडून पुन्हा पुन्हा विचारणा केली तरीही त्या ठोस व मुद्देसूद उत्तर देत नसल्याचे पाहून आमदार पाटील हे म्हैसकर यांच्यावर भडकले. 

"" तुमच्या कार्यालयातील ही कॅबिन आहे काय ? केबिनमध्ये आमदारांना काहीही उत्तरे देऊन वेळ मारून नेता येईल. पण इथे चालणार नाही. ही लोकलेखा समितीची सुनावणी आहे आणि तुम्ही साक्ष देत आहात. याचे भान तुम्हाला आहे की नाही ? '', अशा शब्दात जयंत पाटील यांनी म्हैसकर यांची समितीच्या सदस्यांसमोर खरडपट्टी काढली. म्हैसकर यांच्यावर भडकलेल्या पाटील यांच्याकडे पाहून उपस्थित सदस्यही काही काळ अवाक झाले होते तर, इतर सदस्यांनीही जयंत पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत केल्याचे सांगण्यात आले. 

बैठकीनंतर लोक लेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल आणि इतर सदस्यांसमोर म्हैसकर यांनी आपण आयएएस अधिकारी आणि नगर विकासाच्या सचिव आहोत, मंत्रालयातील शिपाई नाही, आपल्याला सदस्यांनी अशा प्रकारे बोलणे योग्य नसल्याच्या भावना व्यक्त केल्या असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

संबंधित लेख