संपूर्ण कर्जमाफीसाठी दीड लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचे प्रमाण 85 टक्के

राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देऊ केली आहे. त्यामुळे निकषानुसार या पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारला प्राधान्याने कर्जमाफी द्यावी लागणार आहे. त्यानुसार दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या या एकत्रित 33 लाख 80 हजार शेतकऱ्यांना सुमारे 19 हजार 800 कोटी रुपयांची कर्जमाफी सरकारला थेटपणे द्यावी लागणार आहे.
0farmer
0farmer

मुंबई :  शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या सुमारे 33 लाख 80 हजार शेतकऱ्यांना सुमारे 19 हजार 800 कोटी रुपयांची कर्जमाफी सरकारला थेटपणे द्यावी लागणार आहे. यात मुद्दल आणि व्याज अशा दोन्ही रक्कमांचा समावेश आहे. 

दुसरीकडे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत अल्प असून अशा सुमारे 15 टक्के म्हणजेच सव्वासात लाख शेतकऱ्यांकडे 16 हजार 500 कोटींची थकबाकी असल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते. 

राज्यातील शेतकऱ्यांवर डोक्‍यावर पीक कर्ज आणि शेती मुदती कर्जाची 36 हजार 473 कोटींइतकी थकबाकी आहे. यात मुद्दल आणि व्याजाचाही समावेश आहे. राष्ट्रीयकृत, व्यापारी, ग्रामीण आणि जिल्हा सहकारी बॅंकांनी दिलेली ही कर्जे आहेत. राज्यात सध्या 40 लाख 90 हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. त्यापैकी पन्नास हजारांपर्यंत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या जवळपास बेचाळीस टक्के इतकी आहे. 

सुमारे सतरा लाख शेतकऱ्यांचे पीक आणि मुदती कर्ज हे पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे. त्यांची एकंदर थकबाकी 5285 कोटी इतकी आहे. तसेच पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे सव्वा अकरा लाख इतकी लक्षणीय आहे. अशा शेतकऱ्यांची थकबाकी 8360 कोटी इतकी आहे. त्यानंतर एक ते दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेले शेतकरी सुमारे साडेपाच लाख इतके असून त्यांचे 6158 कोटी इतके कर्ज थकीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com