Loan waiver implementation not possible before DIwali | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

ग्रामपंचायत निवडणूका -चावडी वाचनात लटकली कर्जमाफी 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई   : राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला विलंब होत असून चावडी वाचनाच्या भोवऱ्यात या गावांची कर्जमाफी लटकण्याची भिती आहे. 

मुंबई   : राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला विलंब होत असून चावडी वाचनाच्या भोवऱ्यात या गावांची कर्जमाफी लटकण्याची भिती आहे. 

शनिवारी ता.7 व 16 ऑक्‍टोबरला राज्यात 7800 हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकांची आचारसंहिता व प्रक्रियेत प्रशासन व्यस्त असल्याने कर्जमाफीच्या लाभार्थींच्या यादीचे चावडी वाचन होत नाही. गावांत निवडणूक सुरू असल्याने ग्रामसभाही घेता येत नसल्याने चावडी वाचन होत नाही. त्यामुळे, या गावांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कर्जमाफीसाठी सध्या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या नोंदणीची पडताळणी सुरू असून या आठवड्यात प्रत्यक्ष लाभार्थींच्या याद्या तयार होण्याचे संकेत आहेत. मात्र, अनेक बॅंकांनी संबधित जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या सरकारकडे पाठवल्या नसल्याचे कारणही दिले जात आहे.

 त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील बॅंकांकडून कर्जदार शेतकऱ्यांच्या यादी सरकारकडे येत नाहीत तोपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दिवाळीनंतरच होण्याची शक्‍यताही सूत्रांनी वर्तवली. त्यामुळे, कर्जमाफीसाठी गेले चार महिने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या दिवाळीतही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता नाही, असे मानले जाते. 

संबंधित लेख