loan cancal commitee | Sarkarnama

कर्जमाफीच्या निकष निश्‍चितीसाठी उद्या बैठक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जून 2017

मुंबई : शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीचे निकष ठरविण्यासाठी उद्या सोमवारी (19 जुन) दुपारी 4 वाजता शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींसह कर्जमाफी निकष निर्धारण समितीची विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली आहे. 

मुंबई : शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीचे निकष ठरविण्यासाठी उद्या सोमवारी (19 जुन) दुपारी 4 वाजता शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींसह कर्जमाफी निकष निर्धारण समितीची विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांनी केलेला संप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघर्ष यात्रा आणि सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेने सातत्याने केलेला हल्लाबोल या पार्श्‍वभूमीवर योग्य वेळेची भाषा बोलणाऱ्या भाजपला तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र भाजपाने सरसकट ही माफी न करता सशर्त आणि काही निकषावर कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकरी वर्गही संभ्रमात पडलेला आहे. त्यातच खरीप पीक कर्जासाठी दहा हजार रूपये देण्यासही जिल्हा मध्यवर्ती बॅंकांचा आर्थिकदृष्ट्या कमकुवतपणा स्पष्ट झाल्याने राज्य सरकारला व्यापारी बॅंकां व राष्ट्रीयीकृत बॅंकांना मदतीसाठी गळ घालण्याची वेळ आली. 

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उच्चाधिकार समितीच्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीमधील प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली थकीत कर्जबाकी निकष निर्धारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

या समितीची 19 जून रोजी विशेष बैठक होत असून या बैठकीकरिता शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे संयोजक डॉ. अजित नवले, बॅंक कर्मचारी प्रतिनिधी विश्‍वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी धनंजय जाधव (पुणतांबे), संजय पाटील, बळीराम सोळंके (माजलगाव) यांना निमंत्रित केले आहे. 

कोणत्या शेतकऱ्याला कर्ज मिळणार, कोण अपात्र ठेवणार याबाबत या बैठकीत निकष स्पष्ट होणार असल्याने या बैठकीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे आणि राजकीय पक्षांचेही लक्ष लागून राहीले आहे. 

संबंधित लेख