load sheding | Sarkarnama

ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना भारनियमनाचा "शॉक'

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई : औष्णिक वीज प्रकल्पातील काही संच बंद पडल्याने ऐन उन्हाळयात काही भागात भारनियमन करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. या भारनियमनामुळे ऊस, केळी आणि फळबागा आणि उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपली पिके जगवायची कशी ही समस्या भेडसावणार आहे. 
सध्या विजेची कमाल मागणी 19 हजार मेगावॉट आहे. संपूर्ण राज्याची विजेची मागणी सध्या 22 हजार 500 मेगावॉट आहे.

राज्यातील वीज निर्मितीचे काही संच विविध कारणांमुळे बंद पडल्यामुळे सुमारे तीन हजार मेगा वॅट चा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत सुमारे 4 हजार मेगावॉट अचानक तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात महावितरणकडून आवश्‍यकतेनुसार तात्पुरते भारनियमन करण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामीण भागात तात्पुरते भारनियमन करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला असला असून जनतेने सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून गुरुवारी रात्री करण्यात आले आहे. 

कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा अदानी पॉवर प्लॉट आणि एनटीपीसी मधून महावितरणाला वीज उपलब्ध होत असते. राज्यातील कृषी वाहिन्यांसह अकृषक वाहिन्यांवरील डी गटापासून जी 1, जी 2 आणि जी 3 या गटात तात्पुरते भारनियमन करण्यात आले आहे. शेतीपंपाचा वीज पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना वीज पुरवण्याचा महावितरणने निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. दरम्यान, तात्पुरते भारनियमन आटोक्‍यात आणण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, असे कळविले आहे. 
 
संबंधित लेख