घरपोच दारू ही कपोलकल्पित बातमी : मुख्यमंत्री

घरपोच दारू ही कपोलकल्पित बातमी : मुख्यमंत्री

पुणे : घरपोच दारूविक्रीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विरोधात नाही. याबाबतच्या बातम्या कपोलकल्पित आहेत. सरकारची बाजू न घेताच या बातम्या दिल्या गेल्या, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की घरपोच दारू मिळू शकेल का, असा एकाने अर्ज केला होता. त्या आधारे या बातम्या बनविण्यात आल्या. देशभर त्याच्यावर चर्चा घडवून आणल्या. मला याबाबीचे आश्चर्यच वाटते. कोणतीही खातरजमा न करता, अशा बातम्या कशा दिल्या जातात. सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही.

घरपोच दारूविक्रिच्या कथित प्रस्तावाने मात्र विरोधकांना आयते कोलित मिळवून  दिले. आज शिवसेनेचे कार्य़ाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत घरपोच दारू देण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत करा, असा टोमणा मारला. हा प्रस्ताव हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याची टीका ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही सरकारवर यावरून टीका केली. मात्र आता मुख्यमंत्र्यांनीच यावर पडदा टाकल्याने यावर चर्चा थांबण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com