on line 7-12 | Sarkarnama

ऑन लाईन सातबाऱ्याचे चावडीवर वाचन

महेश पांचाळ
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई : तलाठ्याच्या डिजिटल सहीसह ऑनलाईन सातबारा घरबसल्या मिळावा यासाठी महसूल विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत सातबारातील दुरुस्ती व सुधारणांसाठी गावात चावडी वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात सातबारा संगणकीकृत करताना राहिलेल्या दुरुस्ती सुधारण्यासाठी राज्यातील सर्व तालुक्‍यातील गावागावात तलाठ्याच्या उपस्थित 15 मे ते 15 जून या कालावधीत सातबाराचे चावडी वाचन केले जाणार आहे. 

आतापर्यंत खातेदारांना सातबारा मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. यापुढे संगणकीकृत सातबारा 1 ऑगस्ट पासून घरबसल्या उपलब्ध होणार आहे. राज्यातील अडीच कोटी सातबारा संगणकीकृत करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. राष्ट्रीय सूचना केंद्रांच्या मार्गदर्शनाखाली एडिट मोडेल चे काम गेले 9 महिने सुरू आहे. त्यानुसार सातबाऱ्यावरील नाव, खरेदी विक्रीची नोंद आणि सध्या कागदोपत्री हाती असलेला सातबारा यांच्यातील नोंदी तंतोतंत जुळवाजुळव करण्यासाठी महसूल विभागाने जन जागरण अभियान सुरू केले आहे. 

1 मे ते 15 मे 2017 या दरम्यान सरकारी वेबसाइटवर जनतेला आपल्या सातबारा बाबतची माहिती बरोबर आहे की त्यात दुरुस्ती करण्याचे काम ऑनलाइन पद्धतीने करताना येणार आहे. खातेदारांची सातबारावरील माहिती ऑनलाइन टाकताना चुका राहू नये यासाठी तलाठी गावागावात जाऊन चावडी वाचन करणार आहेत. यावेळी सातबाराच्या उताऱ्यावर असलेली माहिती नावे आणि क्षेत्रफळ यात काही बदल असतील तर नागरिक स्वतःहून त्यात सुधारणा सुचवू शकतील.

गावातील प्रत्येकाला सातबारा मधील नोंदीमधील आक्षेप असतील तर ते चावडीवरील बैठकीत तलाठ्याच्या निदर्शनास आणून देऊ शकतात. 16 जून नंतर सातबारा ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

सध्या काही जिल्ह्यातील सातबारा ऑनलाईन प्रत उपलब्ध होते. परंतू 1ऑगस्ट पासून तलाठ्याच्या डिजिटल सहीनिशी सातबाराची प्रत ऑन लाईन उपलब्ध होणार आहे. 

संबंधित लेख