light hike congress agitation in nagpur | Sarkarnama

वीज दरवाढीविरोधात कॉंग्रेसचे नागपुरात आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नागपूर ः विद्युत नियामक आयोगाने आयोजित केलेल्या जनसुनावणी दरम्यान कॉंग्रेस नेत्यांनी वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. राज्य सरकारची वीज दरवाढ अदानी व अंबानीच्या वीज प्रकल्पांचा तोटा भरून काढण्यासाठी होत असल्याचा आरोप करून जनसुनावणी दरम्यान गोंधळाला सुरूवात झाली. 

कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. 

विद्युत नियामक आयोगाने आज नागपुरात "वनामती'च्या कार्यालयात जनसुनावणी आयोजित केली होती. विजेच्या स्थिर दरात वाढ करण्यासाठी ही जनसुनावणी होती. या जनसुनावणीत कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह दाखल झाले. जनसुनावणीच्या बाहेर आमदार सुनील केदार यांच्या छायाचित्रांचे फ्लेक्‍सही लागले होते. ही जनसुनावणी सुरू असताना आमदार केदार यांनी ही वीज दरवाढ रिलायन्स व अदानी समुहाच्या वीज प्रकल्पांना फायदा करण्यासाठी केली जात असल्याचा आरोप केला. 

राज्यात वीज सरप्लस असताना व विजेची मागणी वाढत नसताना ही वीज दरवाढ कशासाठी? असा सवाल नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केला. यावरून नियामक आयोगाचे सदस्य व या नेत्यांमध्ये वादावादी सुरू झाली. " राज्य सरकार मुर्दाबाद ', "मुख्यमंत्री मुर्दाबाद'च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. 

या वादावादीनंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते आरडाओरड करू लागले. जनसुनावणीत व्यत्यय येत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले व आमदार सुनील केदार व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना अटक करण्यात आली. 

संबंधित लेख