leva patil leader demmands eknath khadase's ministry | Sarkarnama

नाथाभाऊंना मंत्रीपद दिले नाही तर 'लेवा पाटील' भाजपला हिसका दाखवणार!  

प्रकाश बनकर 
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

राज्यात समाजाचे मोठे संख्याबळ असतानाही भाजप अन्याय करीत आहे

औरंगाबाद : लेवा पाटीदार समाजाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राजकीय वनवासात टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. राज्यात समाजाचे मोठे संख्याबळ असतानाही भाजप अन्याय करीत आहे, अशी टीका लेवा पाटीदार समाजाचे नेते रमेश पाटील यांनी रविवारी केली.

औरंगाबाद सिडको मधील सौभाग्य मंगल कार्यालयात लेवा पाटीदार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा परिचय कार्यक्रम घेण्यायत आला. या कार्यक्रमानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते

श्री. पाटील म्हणाले, राज्यात लेवा पाटीदार समाज 30 ते 35 लाखांवर आहे. तीन आमदार व एक खासदार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना न्यायालयात दिलासा दिला. यानंतरही त्यांना भाजपाने मंत्रीपदापासून दूर ठेवले. 

मध्यतरी एकनाथ खडसे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीत खडसे प्रवेश करतील अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या, पण तसे काही घडले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत खडसेंचा मूड कसा असणार हे येणारा काळच ठरवेल. मोठे पद देवून भाजपाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.  

संबंधित लेख