हाय प्रोफाईल नेत्यांच्या वस्तीत बिबट्या अवतरल्याने घबराट

आज सकाळी शहरातील सावरकर नगर भागात अवचीत पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. एका नेत्यांच्या घराबाहेर बसविलेल्या "सीसीटिव्ही' मध्ये हा बिबट्या चित्रीत झाला. या भागात विविध आमदार, नगरसेवक , माजी महापौरांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे ही बातमी अल्पावधीत शहरभर पसरल्याने बिबट्या बघण्यासाठी या भागात बघ्यांचा महापुर उसळला होता.
हाय प्रोफाईल नेत्यांच्या वस्तीत बिबट्या अवतरल्याने घबराट

नाशिक : आज सकाळी शहरातील सावरकर नगर भागात अवचीत पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. एका नेत्यांच्या घराबाहेर बसविलेल्या "सीसीटिव्ही' मध्ये हा बिबट्या चित्रीत झाला. या भागात विविध आमदार, नगरसेवक , माजी महापौरांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे ही बातमी अल्पावधीत शहरभर पसरल्याने बिबट्या बघण्यासाठी या भागात बघ्यांचा महापुर उसळला होता.

याच भागात गेल्या महिन्यात 25 जानेवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मोगल आणि माजी आमदार डॉ. निशीगंधा मोगल यांच्या बंगल्याच्या परिसरात बिबट्या शिरला होता. वनविभागाला त्याला पकडण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. बिबट्या पकडतांना त्याच्या हल्ल्यात दोन पत्रकार, शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड आणि वनविभागाचे कर्मचारी जखमी झाले होते. याच भागात आज सकाळी जहागिरदार बेकरी तसेच लगतच्या उद्यानात बिबट्याचा वावर दिसला. हा बिबट्या पहाटे रस्त्याने फिरत असल्याचे दिसले. पुन्हा बिबट्या आढळल्याने एकच धावपळ उडाली. याबाबत नगरसेविका वर्षा भालेराव यांनी वनविभागाला त्याची माहिती दिली. सोशल मिडीयावर नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन विविध नेत्यांनी केले.

गोदावरी नदीलगतच्या या भागात दुसऱ्या बाजुला मखमलाबाद गावाचा शिवार आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणावर शेती, द्राक्षमळे आहेत. त्यात भागात तीन ते चार बिबट्यांचा वावर आहे. यातील बिबटेच या परिसरात येत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. या भागात विविध नगरसेवक माजी महापौर प्रकाश मते, माजी आणदार मोगल, आमदार अनिल कदम यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभागासह पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची मोठी गर्दी उसळल्याने वन विभागाच्या कामात अडथळे येत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com