Leaders Prohibited in Village by angry villagers | Sarkarnama

जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार सगळे भाजपचे; मात्र गावात नेत्यांना झाली गावबंदी! 

संपत देवगिरे  
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

देवळा परिसराच्या हरित क्रांतीसाठी झाडी एरंडगाव कालव्याची संकल्पना कर्मवीस भाऊसाहेब हिरे यांनी चाळीस वर्षापूर्वी मांडली. मात्र अद्याप त्याचे काम झालेच नाही. ग्रामस्थ पाण्याच्या प्रतिक्षेत डोळे लावुन बसले. प्रत्येक निवडणुकीत, साखर कारखान्याच्या प्रचारात नेते येतात. कालव्याचे काम पूर्ण करणार. सगळीकडे पाणीच पाणी करणार असे आश्‍वासन मिळाले. नागरिकांनीही त्या आस्वासनावर मते दिली. मात्र, झाले काहीच नाही. येथील युवक त्याला कंटाळले आहेत. विविध स्तरावर त्यांनी आपला राग व्यक्त केला. 

नाशिक : तीसगाव हे भाजपचे जिल्हाध्यक्ष व नेते दादा जाधव यांचे गाव. येथील खासदार, आमदार सगळे भाजपचेच. मात्र येथे नेते येतात. आश्‍वासन देतात. मते मिळाली की विसरुन जातात. त्याच्या निषेधार्थ राजकीय नेते, सरकारी अधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. खुद्द सत्ताधारी भाजपच्याच गावात लोकांनी पक्ष, जात- धर्म विसरुन हा निर्णय घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

देवळा परिसराच्या हरित क्रांतीसाठी झाडी एरंडगाव कालव्याची संकल्पना कर्मवीस भाऊसाहेब हिरे यांनी चाळीस वर्षापूर्वी मांडली. मात्र अद्याप त्याचे काम झालेच नाही. ग्रामस्थ पाण्याच्या प्रतिक्षेत डोळे लावुन बसले. प्रत्येक निवडणुकीत, साखर कारखान्याच्या प्रचारात नेते येतात. कालव्याचे काम पूर्ण करणार. सगळीकडे पाणीच पाणी करणार असे आश्‍वासन मिळाले. नागरिकांनीही त्या आस्वासनावर मते दिली. मात्र, झाले काहीच नाही. येथील युवक त्याला कंटाळले आहेत. विविध स्तरावर त्यांनी आपला राग व्यक्त केला. 

दोन दिवसांपूर्वी त्यांनी ग्रामसभा घेतली. कालव्यासाठी परिसरातील आठ गावांत सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची घोषणा झाली. सबंध गावाने युवकांच्या या भूमिकेला पाठींबा दिला. सरपंच, उपसरपंच, सर्व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला. त्यात राजकीय नेते, सरकारी कर्मचाऱ्यांना गावबंदीचा ठराव केला. कोणालाही मतांसाठी गावात फिरु दिले जाणार नाही, असे ठरविण्यात आले. त्याच पावलावर पाऊल ठेवत शेजारच्या गावानेही ठराव केला. 

विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व जिल्हा अध्यक्ष दादा जाधव यांचे हे गाव आहे. येथील खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहूल आहेर हे देखील भाजपचेच. सरपंच, उपसरपंचही त्याच पक्षाला मानणारे आहेत हे विशेष. 
 
संबंधित लेख