laxman mane speech in solapur | Sarkarnama

बाळासाहेबांना मुख्यमंत्री अन मला अर्थमंत्री करा : लक्ष्मण माने

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

2019 ला बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील, आणि 2024 ला पंतप्रधान होतील.

पुणे: बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांना 2019 मध्ये आपणाला मुख्यमंत्री करायचे आहे आणि त्या मंत्रीमंडळात मला अर्थमंत्री बनायचे आहे, असे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापुरातील सभेत सांगितले.

लक्ष्मण माने यांच्या अगोदर माजी आमदार विजयराव मोरे यांचे भाषण झाले. वंचित आघाडीला मतदान करण्याची शपथ त्यांनी दिली. तसेच 2019 ला बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील, आणि 2024 ला पंतप्रधान होतील, असा दावा केला. त्यानंतर लक्ष्मण माने म्हणाले, वंचित आघाडीला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे बाळासाहेब मुख्यमंत्री होतील, याची खात्री आहे. आमची सत्ता आल्यास एकही शेतकरी आत्महत्त्या करणार नाही. मोफत शिक्षण दिले जाईल. सर्वांना रोजगार दिला जाईल, पण त्यासाठी मला अर्थमंत्री बनायचे आहे. मी सर्व देवालयांची संपत्ती जप्त करुन सरकारजमा करेन. त्यातून ही सर्व कामे करेन, असे माने म्हणाले. 

संबंधित लेख