laxman mane regrets about that statement | Sarkarnama

`त्या` विधानाबद्दल माय-भगिनींची दिलगीरी : लक्ष्मण माने 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : ओबीसी समाजाच्या पुण्यात नऊ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मी केलेल्या भाषणातील वाक्यांचा गैरअर्थ घेतल्याने माताभगिनी, मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मी महिलांचा आदर करणारा, मातृसत्ताक पद्धती मानणार माणूस आहे. तेव्हा समस्त माय-भगिनी व इतर ज्या कोणाच्या भावना अशा चुकीच्या अर्थामुळे दुखावल्या गेल्या असतील त्यांच्या प्रती जाहीर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे `उपरा`कार लक्ष्मण माने यांनी सांगितले. 

या वादावर पडदा पाडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  मराठा समाजाबाबत या बैठकीत मी चकार शब्द काढलेला नाही. तरीही महाराष्ट्रातून मला धमकीचे हजारो फोन येत आहेत. अज्ञातांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मी न बोललेल्या काही गोष्टी पसरविलेल्या जात आहेत. ज्या समाजाने आतापर्यंत दुःख झेलले त्यांच्या मुक्ततेसाठी मी झटत आहे.  ते दुःख इतरांच्या पदरी यावे, याची अपेक्षा मी कशी करेन? तरी माझ्या भाषणातील काही वाक्यांच्या चुकीच्या अर्थामुळे  कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या या दिलगीरीनंतर सर्वांनी क्रिया- प्रतिकिया थांबवाव्यात, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

संबंधित लेख