laxman mane , mumbai bull news | Sarkarnama

बैलालाही बापाचा दर्जा द्या ! 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई : देशात सिंधू संस्कृतीचे महत्त्वाचे प्रतीक म्हणून या बैलांचे चिन्ह वापरले गेले.सिंधू संस्कृतीच्या काळात त्या संस्कृतीचे पाईक असलेल्या बंजारा, भटक्‍या-विमुक्तांचे लोक हे बैलांच्या पाठीवर ओझे वाहून नेत देश-विदेशात व्यापार करत होते. तोच बैल आज शेतीसाठी राबराब राबतो, त्या बैलाला ज्याप्रमाणे सिंधू संस्कृतीत स्थान होते, त्याच धर्तीवर देशात गायीला आईचे महत्त्व मिळाले असल्याने बैलांनाही बापाचा सन्मान द्यावा अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी केली आहे. 

राज्यात आज साजरा होत असलेल्या बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी ही मागणी केली. आपल्या मागणीवर केवळ राज्यातच नव्हे तर केंद्रातही यावर विचार केला जाईल असेही त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

देशात गायीला ज्या प्रमाणे पूज्य मानले जाते, त्याच धर्तीवर शेतकरी बैलांची पूजा करतो. श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी यासाठी बैलपोळा हा समस्त शेतकरी साजरा करून बैलांप्रती आपली भावना आणि त्यांच्यासोबतचे आपले ऋणानुबंध व्यक्त करत असतो. त्याच दिवाळीसारख्या सणाच्या काळातही गायीबरोबर शेतकरी बैल यांची पूजा करून त्यांचा सन्मान करतो यामुळे आता देशात गायीबद्दल खूप सन्मान आणि भक्तीचे वातावरण वाढले असले तरी यात बैलांवर सापत्नपनाची वागणूक न देता बैल आणि त्याची शेतीच्या उत्पादनासाठी उपयुक्तता लक्षात घेऊन त्यालाही बापाचा दर्जा द्यावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. 

हा दर्जा देण्यासाठी गायकवाड यांनी पुराणातील महत्व आणि त्यासोबत देशात सर्वाधिक प्रमाणावर असलेल्या महादेव मंदिरांच्या समोरील नंदी म्हणजेच बैलाला स्थान असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. 

संबंधित लेख