पडळकरांच्या हातात RSS चा धागा, त्यांनाच आंबेडकरांकडून बळ! 

आंबेडकरांनी आघाडीच्या अधयक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा.
पडळकरांच्या हातात RSS चा धागा, त्यांनाच आंबेडकरांकडून बळ! 

पुणे:  वंचित आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या हातात अजून आरएसएसचा धागा आहे. तरीही त्यांच्या नेतृत्वाला प्रकाश आंबेडकर हे बळ देत आहेत, अशी टीका वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी केली.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना माने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यशैलीवर हल्लाबोल केला. माने म्हणाले, संघ आणि भिडे गुरूजींशी संबंधित असलेल्या पडळकरांना आंबेडकरांनी लोकसभेचे तिकीट दिले. त्यानंतर त्यांना महासचिव आणि प्रवक्तेपद देण्यात आले आहे. पडळकरांच्या हातात अजूनही आरएसएसचा धागा आहे. अजून एक मुस्लीम कार्यकर्ते आहेत. त्यांनाही आंबेडकरांनी पद दिले आहे. वंचित आघाडी ही आंबेडकरांनी उच्चवर्णियांची बनवून ठेवली आहे. त्यामुळे आंबेडकरांनी आघाडीच्या अधयक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com