laxman mane about pawar-ambedkar alliance | Sarkarnama

शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र बसावं, पण तसं घडलं नाही तर मी काय करणार?

संपत मोरे
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मी राजकीयदृष्टया पवार यांच्यापासून २००९ सालीचसालीच दूर गेलो आहे. 

पुणे : 'शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोघांशीही माझे जवळचे संबंध आहेत. त्यांनी एकत्र बसावं अशी माझी इच्छा आहे. पण माझ्या इच्छेप्रमाण घडलं नाही तर काय करणार? मी छोटा कार्यकर्ता आहे.' असं माजी आमदार लक्ष्मण माने यांनी म्हटलं आहे.

"शरद पवार यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, पण माझे आणि त्यांचे राजकीय संबंध नाहीत.घरगुती जिव्हाळा असणं वेगळं आणि राजकारण वेगळं. मी राजकीयदृष्टया पवार यांच्यापासून २००९ सालीच दूर गेलो आहे. 

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र बसावं अस मलाही वाटत पण तसं घडलं नाही तर मी काय करणार? मी छोटा कार्यकर्ता आहे.मी वंचित बहुजन आघाडीचा भाग आहे. त्यामुळे ही आघाडी मजबूत व्हावी म्हणून मी प्रयत्न करतोय", असे माने म्हणाले.

संबंधित लेख