आजचा वाढदिवस : आमदार लक्ष्मण जगताप, चिंचवड

लक्ष्मण जगताप हे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार आहेत. "भाऊ' म्हणून ते या परिसरात परिचित आहेत.
आजचा वाढदिवस : आमदार लक्ष्मण जगताप, चिंचवड

लक्ष्मण जगताप हे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार आहेत. "भाऊ' म्हणून ते या परिसरात परिचित आहेत. गेल्या 32 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. चिंचवड मतदारसंघातून 2014 ला ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत. त्यापूर्वी ते दोनदा विधानपरिषेचे सदस्य होते. अपक्ष म्हणून ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. नंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. विधानपरिषद सदस्य होण्याअगोदर ते वीस वर्षे पिंपरी पालिकेत नगरसेवक होते. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद त्यांनी भुषविलेले आहे. 

2014 ची लोकसभेची निवडणूक ते शेकाप पुरस्कृत म्हणून मावळमधून लढले होते. त्यात त्यांचा पराभव झाला. नंतर त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते चिंचवडमधून भाजपकडून निवडून आले. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजप सत्तेत आला. त्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाऊ हे आता शहराचे नेते तथा दादा म्हणून ओळखले जात आहेत. आपल्या समर्थकांनी नोकरी करण्यापेक्षा धंदा, व्यवसाय करावा या विचाराचे ते आहेत. कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्याकडे आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे ते अध्यक्षही आहेत. नुकतेच मातोश्रींचे निधन झाल्याने वाढदिवस साधेपणाने करणार आहेत. वाढदिवसाचे फ्लेक्‍स न लावण्याची सुचनाही त्यांनी आपल्या समर्थकांना दिली आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com