Laxmam Jagtap Criticizes Barne | Sarkarnama

प्राधिकरणाच्या जागा लाटण्यातच बारणेंची धन्यता : लक्ष्मण जगताप 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पिंपरी : माझ्या कामाचा लेखाजोखा मांडल्यानंतरच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत जनतेचे भाजपची सत्ता आणली. दुसरीकडे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पदरी अपयश टाकले. यानंतरही बारणे खुमखुमी असेल, तर तारीख, वेळ आणि ठिकाण सांगावे, तेथे येऊन पुन्हा मी माझ्या कामाचा लेखाजोखा मांडेल, अशा शब्दांत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना प्रतिआव्हान दिले. 

एका व्यासपीठावर येऊन कामाचा हिशोब देण्याचे बारणे यांचे आव्हानही त्यांनी लगेच स्वीकारले. त्यामुळे या दोघांतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

जगताप यांनी शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनपैकी आपलाच म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा विकासामध्ये सरस असल्याचा दावाही केला आहे. तर, याच मतदारसंघ मोडत असलेला बारणे यांचा भाग असल्याचे म्हटले आहे. पालिका 
निवडणुकीतील अपयशानंतर पुन्हा माझ्या कामगिरीचा लेखाजोखा अपयशी बारणे यांनी मागणे हास्यापद असल्याचेही जगताप यांनी नमूद केले आहे. 

जगताप म्हणाले की बारणे यांनी राजकीय जीवनात विकासाऐवजी प्राधिकरणाच्या जागा दुसऱ्याच्या नावांवर लाटण्यातच धन्यता मानली. त्यामुळेच थेरगावमधील नागरिकांनी पालिका निवडणुकीत भाजपला साथ दिली. भाजप या भागातील जनतेचे ऋण कधीही विसरणार नाही आणि विकास काय असतो, हे आता येथील जनतेला आम्ही दाखवून देऊ. प्रश्नांचे भांडवल करून राजकीय पोळी भाजण्यात बारणे माहीत आहेत. आतापर्यंत त्यांनी तेच केले. त्यामुळेच ते राजकारणात टिकले. लोकांच्या भावना भडकावायच्या आणि निवडून यायचे, एवढेच उद्योग त्यांनी केले. 

"अवघे पाच नगरसेवक निवडून आण्याची क्षमता नसताना मोदी लाटेत शहरातील प्रलंबित प्रश्नांचे भांडवल करून ते खासदार झाले. गेल्या साडेतीन वर्षांत शहरातील कोणताच प्रश्न त्यांना मार्गी लावता आलेला नाही. मंत्र्यांना निवेदन देताना फोटो काढायचे आणि प्रसिद्धी मिळवायची एवढेच उद्योग बारणे यांनी केले आहेत,'' असा घणाघात जगताप यांनी केला. 

संबंधित लेख