latur zp and opposition member | Sarkarnama

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्नेहभोजनाला बंडाची फोडणी

विकास गाढवे
सोमवार, 30 जुलै 2018

लातूर : महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी स्थायी आणि सर्वसाधारण सभेला दांडी मारल्याची घटना ताजी असतानाच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे यांनी सोमवारी (ता. 30) बोलावलेल्या गेट टुगेदर अर्थात स्नेहभोजनावर भाजपच्याच सदस्यांनी बहिष्कार टाकला. यात दोन सभापतींसह वीस सदस्यांचा समावेश होता. योगायोगाने घडलेल्या या घटनेला बंडाचे स्वरूप देऊन भाजपातील विरोधी गटासह कॉंग्रेसच्या सदस्यांनी सोशल मिडियावर या चर्चेला चांगलीच हवा दिली. 

कॉंग्रेसची सत्ता असलेली जिल्हा परिषद व त्यानंतर महानगरपालिका ताब्यात घेऊन भाजपने जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पण हे यश भाजपच्या पचनी पडतांना दिसत नाहीये. महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपला आपल्याच सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दीडशे कोटींच्या विकास कामांच्या निविदांवर चर्चा करण्यासाठी आयोजित महापालिकेतील दोन्ही सर्वसाधारण सभांवर भाजपच्याच सदस्यांनी बहिष्कार टाकून अघोषित बंड केले होते. पक्षाने याची गंभीर दखल घेऊन दोन पक्ष निरीक्षकांनाही नगरसेवकांसोबत चर्चा करण्यासाठी पाठवले होते. दोन दिवसापूर्वी निरीक्षकांनी नगरसेवकांशी चर्चाही केली. 

महापालिकेतील बंड शमत नाही तोच सोमवारी जिल्हा परिषदेत बंडाचे लोण पोहचले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लातूरे यांनी एका हॉटेलमध्ये भाजपच्या सदस्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. सकाळी अकरा वाजता आयोजित या स्नेहभोजनाला भाजपच्या 36 पैकी वीसहून अधिक सदस्य गैरहजर राहिले. यात दोन विषय समिती सभापतींचा समावेश होता. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. भाजपच्या अंतर्गत विरोधी गटासह विरोधी पक्षांनी याचे चांगलेच भांडवल करत आपले इप्सित साध्य करून घेतले. त्यानंतर या प्रकारणावर सारवासारव करतांना मिलिंद लातूरे यांची मात्र चांगलीच दमछाक झाली होती. 

काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी स्नेहभोजनाच्या निमित्ताने दरमहा एकत्र येण्याचे ठरले. त्याचा खर्चही त्या त्या सदस्याने करावयाचा निर्णय झाला होता. या उपक्रमाची सुरवात सोमवारी माझ्यापासून झाली व मी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. ही पक्षाची किंवा जिल्हा परिषदेची बैठक नव्हती. अनेक सदस्य व काही पदाधिकारी त्यांच्या अडचणीमुळे आले नाहीत. स्नेहभोजनापेक्षा त्यांना काही महत्वाची कामे लागली असतील. या घटनेचा काढलेला राजकीय अर्थ चुकीचा आहे. त्यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण मिलिंद लातूरे यांनी दिले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख