latur zp | Sarkarnama

लातूर जिल्हा परिषदेत नवीन सदस्यांची संख्या सर्वाधिक

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

लातूर ः एकीकडे घराणेशाही आणि कुटुंबातील व्यक्तींनाच उमेदवारी देण्याची स्पर्धा, तर दुसरीकडे 58 सदस्यांच्या लातूर जिल्हा परिषदेतील 54 सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आलेले. लातूर जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली. भाजप त्यात आघाडीवर होते.

तेच तेच चेहरे पाहून कंटाळलेल्या मतदारांनी देखील नव्यांना संधी देत 95 टक्के नवे चेहरे निवडून दिले. पहिल्याच प्रयत्नांत मिनी विधानसभेत एन्ट्री मिळाल्यामुळे हे सदस्य देखील जाम खूष आहेत. 

लातूर जिल्हा परिषद निवडणूक यंदा अनेक कारणांमुळे चर्चेत होती. गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता भाजपने दणदणीत बहुमतासह हिसकावून घेतली.

आमदार अमित देशमुख, दिलीपराव देशमुख ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सारख्या ज्येष्ठ मातब्बर नेत्यांवर मात करत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यात कमळ फुलवले. नव्या चेहऱ्यांना संधी हे या यशामागील महत्त्वाचे कारण समजले जाते. भाजपचे रामचंद्र तिरूके, संतोष वाघमारे, कॉंग्रेसचे नारायण लोखंडे आणि राष्ट्रवादीच्या आशा पाटील हे चार सदस्य सोडले तर इतर निवडून आलेले 54 सदस्य हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे होते. 
कॉंग्रेसचा ओढा जुन्यांकडेच 
जिल्हा परिषदेच्या 58 गटात उमेदवार देतांना कॉंग्रेसने सावध पावले उचलत जुन्या सदस्यांनाच पुन्हा मैदानात उतरवले होते.

भाजपचा झंझावात पाहता धोका नको हा त्यामागचा विचार होता. त्यामुळे धीरज देशमुख, धनंजय देशमुख, रुक्‍मिणीबाई जाधव, कोमलबाई धुमाळ, संगीता शिंदे, शालिनी चव्हाण, संतोष तिडके, उद्धव चेपट, शोभा ढमाले, साधना जाधव, परमेश्वर वाघमारे, सोनाली थोरमोटे, शीना ढगे, शितल पाटील हे 14 नवे चेहरे व दुसऱ्यांदा विजयी झालेले दोन असे कॉंग्रेसचे 16 सदस्यच जिल्हा परिषदेत विजयी होऊ शकले.

राष्ट्रवादीचे सुभाष पवार, दिलीप नाडे, मंचकराव पाटील, माधव जाधव हे चौघे तर शिवसेनेकडून संगीता माने आणि अपक्ष अनिता परगे यांनी पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषदेत प्रवेश मिळवला. 

संबंधित लेख