Latur : A youth attempts self immolation | Sarkarnama

लातुरात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

  हरी तुगावकर 
मंगळवार, 24 जुलै 2018

दरम्यान, अमोल जगताप या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

लातूरः मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुक्‍यात तरुणाने गोदावरी पात्रात उडी घेतली. याचे पडसाद आज महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने लातूरात देखील उमटले. बंदला जिल्ह्यात उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला. 

दरम्यान, अमोल जगताप या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. डोळ्यात पेट्रोल गेल्याने त्याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

शहरात मराठा क्रांती मोर्चाचे तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. शहरात काळी पिवळी, इडली सेंटरवर दगडफेक करण्यात आली. तर निलंगा येथे एका बसवर दगडफेक करण्यात आली. औसा येथे पाण्याच्या टाकीवर चढून आदोलकांनी आंदोलन केले. खरोळा (ता. रेणापूर) येथे अर्धा तास रास्ता रोको 
करून शासनाचा निषेध करण्यात आला. 

बंद दरम्यान जिल्ह्यातील बस वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलकांकडून ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली जात होती.

 

संबंधित लेख