latur parbhani | Sarkarnama

लातूर व चंद्रपूरमध्ये भाजप, परभणीत कॉंग्रेस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लातूर : महापालिका निवडणुकीत अमित देशमुख यांच्या सत्तेला जोरदार हादरा देत संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भाजपला 38 जागा मिळवून देत महापालिका ताब्यात घेतली आहे. जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील काही पालिका जिंकल्यानंतर निलंगेकरांची घोडदौड महापालिकेपर्यंत सुरू आहे. मात्र परभणीत कॉंग्रेसने आपला वरचष्मा कायम राखला आहे. तिथे भाजपला दोन आकडी संख्याही अद्याप गाठता आलेली नाही. कॉंग्रेसला इथे 31 जागा मिळाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची सत्ता आणली आहे. चंद्रपूरमध्ये भाजप सत्तेच्या अगदी जवळ इथे भाजपला 32 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 34 जागांची गरज आहे. 

संबंधित लेख