Latur Municipal corporation Congress NCP | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

रायगडात सुनील तटकरे जिंकले
देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

लातूर महापालिकेसाठी राष्ट्रवादीचा काँग्रेसला नकार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 मार्च 2017

लातूर : 'बुडते को तिनके का सहारा ही बहुत' असे म्हटले जाते, पण सध्या पराभवामुळे अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आगामी महापालिका निवडणुकीत साथ न देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे एकीकडे पक्षाला खिंडार पडतेय तर दुसरीकडे ज्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिले त्यांनी देखील पाठ फिरवल्याने लातूरमध्ये काँग्रेस समोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. 

महापालिका निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करुन सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

ग्रामीण भागात राष्ट्रवादीची जेमतेम ताकद असली तरी शहरात त्यांचे उपद्रव मूल्य अधिक आहे. त्यामुळे भाजप वरचढ ठरत असताना काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ महत्त्वाची ठरणार होती. पण बुडत्या जहाजात न थांबण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेत सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्याचे कळते. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच मुख्य लढत होऊन काँग्रेसला 48 तर, राष्ट्रवादीला 13 जागा मिळाल्या होत्या. दहा ते बारा वॉर्डात राष्ट्रवादीचे उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते.

काँग्रेसशी आघाडी केल्यास पक्षाचे नुकसान होईल असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केला, त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करण्याचा राष्ट्रवादीचा विचार नसल्याचे सावे यांनी जाहीर करून टाकले.

संबंधित लेख