latur muncipal corporation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

लातूर कॉंग्रेसमुक्त, महापालिकेवर भाजपचा झेंडा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पाच वर्षाच्या महापालिकेतील गैरकारभाराला कंटाळलेल्या लातूरकरांनी सक्षम व योग्य पर्याय म्हणून भाजपला पसंती देत शहराच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. वर्षानुवर्षे सत्ता हातात असून देखील लातूरकरांचे रस्ते, कचरा, दिवे आणि पाणी हे मूलभूत प्रश्‍न सोडवण्यात कॉंग्रेसला यश आले नाही. 

लातूर : "परिवर्तन तर होणारच' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या प्रचार सभेत छातीठोकपणे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू सहकारी अशी नवी ओळख निर्माण केलेल्या पालक तथा कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवत लातूर महापालिकेवर भाजप झेंडा फडकवला आहे. देशमुखांच्या गढीला हादरा देत भाजपने 41 जागा जिंकत स्पष्ट बहुमतासह महापालिकेची सत्ता मिळवली आहे. कॉंग्रेसची या निवडणुकीत घसरगुंडी झाली असून त्यांची संख्या 49 वरून 28 वर म्हणजेच 21 ने घटली आहे. राष्ट्रवादीने कसेबसे खाते उघडले तर शिवसेना, एमआयएमला लातूरकरांनी थाराच दिला नाही. 

लातूर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून जाहीर झालेल्या आकडेवारीने कॉंग्रेसचा "निक्काल' लावला आहे. 2012 मध्ये 49 जागांसह दोन तृतीयांश बहुमताची सत्ता मिळवलेल्या कॉंग्रेसला यावेळी मात्र लातूरकरांनी दूर लोटले आहे. तब्बल 21 जागांचा फटका बसल्याने कॉंग्रेसला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले आहे. पाच वर्षाच्या महापालिकेतील गैरकारभाराला कंटाळलेल्या लातूरकरांनी सक्षम व योग्य पर्याय म्हणून भाजपला पसंती देत शहराच्या विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. वर्षानुवर्षे सत्ता हातात असून देखील लातूरकरांचे रस्ते, कचरा, दिवे आणि पाणी हे मूलभूत प्रश्‍न सोडवण्यात कॉंग्रेसला यश आले नाही. लोकांना या सुविधा पदरात पाडून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले होते. त्याचा फटका यावेळी कॉंग्रेसला बसला. या उलट दुष्काळात पाण्यावाचून तडफडणाऱ्या लातूरकरांना मिरजेचे पाणी रेल्वेने आणून भाजपने त्यांची तहान भागवली. त्याचे फळ भाजपला विजयाच्या रुपाने मिळाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम, आरपीआयसह इतर पक्षांनी मतदारांना साफ नाकारले असून त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. 
..................................... 
कोणत्या पक्षाला किती जागा 
भाजप- 41 कॉंग्रेस- 28 राष्ट्रवादी- 01 शिवसेना-00 एमआयएम-00 
रिपाइं - 00 
 

संबंधित लेख