latur bjp mayor | Sarkarnama

लातूरमध्ये भाजपच्या महापौरांना कॉंग्रेसकडून बांगड्या, साडी चोळीचा आहेर

हरी तुगावकर
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

लातूर : शहरात समान विकास कामाचे नियोजन करावे या मागणीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. या नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांना साडी, चोळी, बुरखा, बांगड्यांचा आहेर दिला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला. महिला नगरसेवकांनी तर बराच वेळ ठिय्या आंदोलन केले. 

शहराच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 19) महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. " ये कैसा भ्रष्टाचारी कानून है, ये तो अंधा कानून है' अशा घोषणा देत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. सभागृह दणाणून सोडले. नगरसेवक युनुस मोमीन यांनी तर कोण निधी देता का निधी असा फलक व कावड गळ्यात अडकवून सभागृहात प्रवेश केला. 

महापौरांचा त्यांनी निषेध केला. घोषणा बाजीनंतर नगरसेवक महापौरांच्या डायसवर चढले. या वेळी घोषणाबाजी सुरूच होती. भ्रष्टाचाराचे आरोपही सुरूच होते. या गोंधळात महिला नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांना साडी, चोळी, बुरखा, बांगड्यांचा आहेर दिला. या वेळी भाजप व कॉंग्रेसच्या महिला नगरसेवकात आहेर देण्यात येत असलेल्या साडी, बुरख्यावरून धराधरी झाली. त्या नंतर महिला नगरसेवकांनी महापौरांच्या समोरच्या जागेत ठिय्या आंदोलन केले. 

संबंधित लेख