दिवंगत चिंतामण वनगा यांच्या लेटरहेडचा ठेकेदारांकडून गैरवापर -विवेक पंडित 

वनगा यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन कोऱ्या लेटरहेडवर भाजपमधील काही मंडळी आणि ठेकेदार सह्या घेऊन ठेवत होते. आता त्यांच्या निधनानंतर मागच्या (मृत्यू पूर्वीच्या) तारखा टाकून काही ठेकेदारांना बांधकामाची कामे देणारी शिफारस पत्रे तयार करण्यात आल्याचे विवेक पंडित यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
chintaman_vanga
chintaman_vanga

पालघर   : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांच्या लेटरहेडचा वापर करून राजकीय मंडळी आणि ठेकेदार गैरवापर करत असल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

वनगा यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन कोऱ्या लेटरहेडवर भाजपमधील काही मंडळी आणि ठेकेदार सह्या घेऊन ठेवत होते. आता त्यांच्या निधनानंतर मागच्या (मृत्यू पूर्वीच्या) तारखा टाकून काही ठेकेदारांना बांधकामाची कामे देणारी शिफारस पत्रे तयार करण्यात आल्याचे विवेक पंडित यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

ही बनावटपत्रे राज्य सरकारकडे; तसेच ठाणे-पालघरमधील बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दिली असल्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे.


वनगा यांच्या निधनानंतर त्या आधीच्या तारखांची आलेली पत्रे स्वीकारू नयेत आणि त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये. याबाबतच्या सक्त सूचना आपण संबंधित सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.

अशा प्रकारची पत्रे जमा करण्यात आली असल्यास त्यांची चौकशी करून संबंधितांवर खोटे कागदपत्रे बनवल्याबाबतचा; तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही विवेक पंडित यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com