Late Atal Bihari Vajpayees's ashes arrive in Parbhani | Sarkarnama

परभणी : अटलजींचा अस्थीकलश परभणी जिल्ह्यात दाखल

सरकारनामा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

परभणी जिल्ह्यातील सर्वप्रथम देवगावफाटा येथे रात्री  साडे सात वाजता अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे आगमन झाले.

परभणी :  माजी  पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरूवारी  (  २३) रात्री साडे सात वाजता देवगावफाटा ( ता सेलू ) येथे दाखल झाल्यानंतर दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. 
 

वाजपेयींच्या अस्थिचे महाराष्ट्रात केवळ आठ ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री परभणी जिल्ह्यातील सर्वप्रथम देवगावफाटा येथे रात्री  साडे सात वाजता अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे आगमन झाले. अस्थिकलश देवगावफाटा परिसरातील नागरिकांच्या दर्शनाकरीता ठेवण्यात आला होता. 

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, परभणीचे भाजपा जिल्हा अध्यक्ष अभय चाटे, भाजपा राज्य सरचिटणीस सुरजितसिंग ठाकुर, मेघना बोर्डीकर, सेलू कृउबा समितीचे सभापती रवींद्र डासाळकर, उप सभापती सुंदर गाडेकर, दिनकर देशपांडे आदींची उपस्थित होती. याप्रसंगी अटलजीवर प्रेम करणारे नागरिक, भाजपासह सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटलजी अमर रहे... अमर रहे अशा घोषणा देत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. 
 

संबंधित लेख