Last rites performed on ex mla Yadavrao Bhoyar | Sarkarnama

कॉंग्रेसचे माजी आमदार यादवराव भोयर यांच्यवर अंत्यसंस्कार 

सरकारनामा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

यादवराव भोयर यांनी 1985 ते 1995 पर्यंत कामठी (जि. नागपूर) विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले.

नागपूर :  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार यादवराव भोयर यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्‍यातील यादवराव भोयर यांनी 1985 ते 1995 पर्यंत कामठी (जि. नागपूर) विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. जिल्ह्यातील राजकारणात एक मनमिळावू व निष्ठावंत कॉंग्रेसचा नेता म्हणून त्यांची नागपूर जिल्ह्यात ओळख होती. 

त्यांनी कामठी तालुक्‍यात शिक्षण संस्थांचे जाळे विणले. त्यांनी महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून यादवराव भोयर ओळखले जात होते.  

कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता म्हणून इरखेडा गावातून राजकीय जीवनाला सुरूवात करणाऱ्या यादवराव भोयर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या पश्‍चात नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर आहेत. इरखेडा येथे सोमवारी यादवराव भोयर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

संबंधित लेख