lankrushana adavani | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

संघाच्या दसरा मेळाव्याला अडवाणी हजेरी लावणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मोहम्मद अली जिनाप्रकरणी केलेल्या विधानानंतर संघाने त्यांच्यापासून अंतर राखले असल्याचे बोलले जात होते. या पार्श्‍वभूमीवर लालकृष्ण अडवाणी यावेळी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.  काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदींच्या कारभारावर रा. स्व. संघ नाराज असल्याचे सांगितले होते. 

नागपूर : माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. ते 29 सप्टेंबरला नागपुरात येत आहेत. 
गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण अडवाणी भाजप व केंद्र सरकारच्या सक्रीय राजकारणापासून दूर झाल्याचे दिसत आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी व भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाह आल्यापासून अडवाणींना दूर ठेवल्याचा आरोप होत आहे. 

अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मोहम्मद अली जिनाप्रकरणी केलेल्या विधानानंतर संघाने त्यांच्यापासून अंतर राखले असल्याचे बोलले जात होते. या पार्श्‍वभूमीवर लालकृष्ण अडवाणी यावेळी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 
काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदींच्या कारभारावर रा. स्व. संघ नाराज असल्याचे सांगितले होते. 

रा. स्व. संघाने अडवाणींना कार्यक्रमासाठी बोलाविले नसून ते स्वतः या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. लालकृष्ण अडवाणी 29 सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजता नागपुरात येणार असून ते वर्धमाननगरातील एका उद्योजकांच्या घरी मुक्काम करणार आहेत. 30 सप्टेंबरला सकाळी साडेसात वाजता होणाऱ्या विजयादशमी व शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ते रेशीमबाग मैदानावर राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता ते दिल्लीला रवाना होणार आहेत. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी अडवाणी यांची चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 
 

संबंधित लेख