lanke asks , Why should we do only labor work ? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

लंके म्हणाले ,आम्ही केवळ सतरंज्याच उचलायच्या का ?

 सरकारनामा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

शिवसेना पक्षाचे आम्ही चांगले व निष्ठेने पक्षवाढीचे काम करत असतानाही आम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आले. आम्हाला पक्षातून बाहेर का  पडावे का लागले? हे आपणा सर्वांना चांगले माहीत आहे. आम्ही केवळ सतरंज्या उचलण्याचेच काम करावे का?

-निलेश लंके

पारनेर: " आमदार  बच्चू कडू यांचे विचार  व आदर्श घेऊन या पुढील काळात निलेश लंके प्रतिष्ठाणचे काम पारनेर-नगर मतदार संघात आम्ही करणार आहोत. आगामी विधानसभेत गुलाल आमचाच आहे, निवडणुक अपक्ष लढवायची की एखद्या पक्षाच्या चिन्हांवर  ते मात्र वेळ आल्यानंतर कार्यकर्त्यांना विचारून व विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येणार  आहे. त्यामुळे आमच्या पुढे  निवडणुकीचे सर्व पर्याय खुले आहेत," असे प्रतिपादन माजी शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश लंके यांनी केले.

निलेश लंके प्रतिष्ठानाच्या वतीने पारनेर-नगर विधान सभा मतदार संघातील प्रतिष्ठानाच्या विविध पदांच्यानियुक्त्या  जाहीर करण्यासाठी आयोजीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लंके बोलत होते.  या वेळी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापू शिर्के, सुरेश धुरपते उपस्थीत होते.

लंके म्हणाले, " विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अद्याप पक्षचिन्ह ठरले नाही ,मात्र अनेक पक्षातून विचारणा होत आहे. तो निर्णय मात्र आगामी काळात विचार पुर्वक व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाणार आहे. निलेश लंके प्रतिष्ठानाच्या माध्यामातून आम्ही या पुढील काळात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटने  प्रमाणे शिस्तबद्ध  काम करणार आहोत. शिवसेना पक्षाचे आम्ही चांगले व निष्ठेने पक्षवाढीचे काम करत असतानाही आम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आले. आम्हाला पक्षातून बाहेर का  पडावे का लागले? हे आपणा सर्वांना चांगले माहीत आहे. आम्ही केवळ सतरंज्या उचलण्याचेच काम करावे का?  असा सवाल लंके यांनी केला.

नुकत्याच तालुक्यात झालेल्या दोनही ग्रामपंचायतीत निलेश लंके प्रतिष्ठनचा विजय झाला आहे.  त्यामुळे आगामी विधानसभाही  आपलीच आहे असेही ते म्हणाले.

आमदार विजय औटी यांच्यावर टीका करताना त्यांचे नाव न  घेता ते म्हणाले, " सध्या एक व्यक्ती आमदार आहे, भविष्यात मी आमदार झाल्यावर तालुक्यातील प्रत्येक  व्यक्ती ही आमदार असेल. तालुक्याचे लोकप्रतिनिधी विविध विकास कामांच्या चकीची  आकडेवारी सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टिकाही या वेळी लंके यांनी केली. या प्रसंगी मतदार संघातील विविध ठिकाणचे शाखा प्रमुख, युवा संघटणा, महिला संघटना , विध्यार्थी संघटना   तसेच महिला संघटनांच्या पदाधिका-यांच्या निवडी जाहीर करूऩ त्यांना नियुक्ती पत्रेही देण्यात आली.

संबंधित लेख