land corruption robert wadra summons from ed | Sarkarnama

सोनिया गांधीच्या जावईबापूंच्या अडचणीत वाढ 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राजस्थानमधील जमीन गैरव्यवहारप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. "ईडी' ने त्यांना समन्स बजावले असून त्यांची कोणत्याही वेळी चौकशी होऊ शकते. 

नवी दिल्ली : राजस्थानमधील जमीन गैरव्यवहारप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. "ईडी' ने त्यांना समन्स बजावले असून त्यांची कोणत्याही वेळी चौकशी होऊ शकते. 

राजस्थानमधील बिकानेरमध्ये झालेल्या भूखंड गैरव्यवहारप्रकरणी मनी लॉंड्रींगचे प्रकरण गाजले होते. तत्कालिन कॉंग्रेस सरकारने रॉबर्ट यांना या प्रकरणी मदत केली होती. या प्रकरणावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडत कारवाई करण्याची मागणीही केली होती. "ईडी' च्या समन्सनंतर वद्रा यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, की गेल्या साडेचार वर्षापासून या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला मी सहकार्य करीत आहे आणि यापुढेही करीत नाही. 

"" यापूर्वीही मला ईडीने समन्स पाटविले होते. त्यांना सहकार्य करताना माझ्याकडील काही कागदपत्रे त्यांना दिली होती. माझ्या वकीलांनी तीन तास थांबून त्यांना कागदपत्रे दिली होती. आता ती कागदपत्रे पुन्हा मला सादर करायची आहे. आता पुन्हा मला समन्स पाठविण्यात आले असले तरी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. असे वद्रा यांनी म्हटले आहे. 

माझी चौकशी हा राजकारणाचाही एक भाग असून सुरू असलेली कारवाई चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख