lalu yadav helth admited in mumbai | Sarkarnama

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर वांद्रे-कुर्ला संकुलातील एशियन हर्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याचे ट्विट बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केले आहे.

चारा गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा भोगत असताना वैद्यकीय उपचारांसाठी लालूप्रसाद यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी त्यांच्यावर रांची तसेच दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार झाले आहेत. त्यांना जूनमध्ये एशियन हर्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले.

 काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते; मात्र ऑगस्टच्या सुरुवातीला पुन्हा त्यांना संसर्गाचा त्रास झाल्याने मुंबईत हलवण्यात आले. तेजस्वी यादव यांनी सोमवारी रुग्णालयात त्यांची भेट घेतली. 

संबंधित लेख