lalu yadav | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

लालू प्रसांदाच्या अडचणीत वाढ, गुन्हेगारी खटला चालणार

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

नवी दिल्ली : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यादव आणि त्यांच्या अन्य साथीदारास विरोधातील कलमे काढून टाकण्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात यादव यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याबद्दल खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हा त्यांना मोठा धक्का समजला जातो. 

या गैरव्यवहारात विविध प्रकरणांची सुनावणी स्वतंत्रपणे करण्यात यावी, अशी मागणी "सीबीआय'ने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने "सीबीआय'ची मागणी मान्य केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलत यादव यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालवण्यास हिरवा कंदील दिला आहे. 
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात 20 एप्रिल रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. यासोबतच सर्व पक्षकारांना आठवड्याभरात सूचना देण्यास सांगितले होते. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेवरदेखील सुनावणी केली. या प्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेला यादव यांनी आव्हान दिले होते. 

संबंधित लेख