धावपटू ललिता बाबरचा शाही विवाह ! 

विवाहासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार व सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या प्रतिनिधीव्दारे शुभेच्छा संदेश पाठविला. अभिनेत्री अमृता खानविलकर, दिग्दर्शक संजय जाधव यांची लक्षवेधी उपस्थिती सोहळ्याला होती..
धावपटू ललिता बाबरचा शाही विवाह ! 
धावपटू ललिता बाबरचा शाही विवाह ! 

सातारा : सनई चौघड्याच्या सुरांच्या साथीत आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत धावपटू ललिता बाबर व आयआरएस अधिकारी संदीप भोसले हे दोघे विवाहबद्ध झाले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय, क्रीडा, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

साताऱ्यातील यशोदा टेक्‍निकल इन्स्टिट्यूटच्या मैदानावर शाही मंडप उभारण्यात आला होता. खूप गर्दी होणार हे लक्षात घेऊन सकाळपासूनच नागरिक मंडपात येत होते. सर्वत्र स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. विवाहाचे व्यासपीठ फुलांनी सजविण्यात आले होते. विवाह मंडपाला एखाद्या महालासारखे रूप देण्यात आले होते. वर संदीप भोसले हे घोड्यावरून तर वधू ललिता बाबर या मेण्यातून मंडपात आले. अडीचच्या सुमारास विवाह विधींना प्रारंभ झाला. 

वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोकणचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आयकर विभागाचे सहआयुक्त नितीन वाघमोडे, खानापूरचे आमदार अनिल बाबर, माणचे आमदार जयकुमार गोरे, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी अध्यक्ष सुभाष नरळे, ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिल सुमारेवाला, आदी उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com