lakhnau-priyanka-gandhi-road-show | Sarkarnama

`प्रियांका'मय लखनौमध्ये `रोड शो' जल्लोषात सुरू

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे - कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदच उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेवले आणि तितक्याच जल्लोषात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांचे स्वागत करीत पहिल्या-वहिल्या `रोड शो'ला प्रतिसाद दिला आहे. 

`प्रियांका'मय लखनौमध्ये आज जिकडे-तिकडे प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू आहे. कार्यकर्ते नाचताहेत. ढोल-ताशे वाजवाताहेत. कॉंग्रसचे झेंडे फडकवताहेत. रस्त्यांच्या दुतर्फा प्रियांकांना पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली आहे. एका बसच्या टप्पावर प्रियांका गांधी यांच्यासोबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया, राजबब्बर सहभागी झाले आहेत. 

प्रियांका गांधी यांनी कालच `मी लखनौला येतेय. आपण सर्व मिळून नव्या राजकारणाला सुरवात करूया आणि राजकारणातील बदलामध्ये तुमची प्रमुख भूमिका राहणार आहे. तरुण, महिला आणि विस्थापित या सर्वांचा आवाज एेकला जाईल. चला नवीन भविष्य आणि राजकारण घडवूया,' असे सांगितले होते. त्यामुळे आजच्या वातावरणाने आणि प्रतिसादाने प्रियांका गांधींची नव्या बदलाची भूमिका कार्यकर्त्यांना मनोमन पटल्याचे जाणवत आहे.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख