kunal kumar transfers to center | Sarkarnama

पुण्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची बदली : त्यांच्या जागी सौरभ राव?

ज्ञानेश सावंत
बुधवार, 7 मार्च 2018

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात नियुक्ती करण्याचा आदेश आज जारी झाला. त्यामुळे त्यांची पुण्यातून बदली होण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता त्यांच्या जागी कोण येणार, याची उत्सुकता आहे.

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात नियुक्ती करण्याचा आदेश आज जारी झाला. त्यामुळे त्यांची पुण्यातून बदली होण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता त्यांच्या जागी कोण येणार, याची उत्सुकता आहे.

 
कुणाल कुमार हे तब्बल पावणे चार वर्षे पुण्याचे आयुक्त होते. त्यांनी आधीच्या टप्प्यांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्‍वास संपादन केला. नंतर सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेत्यांनाही त्यांनी आपलेसे केले. परिणामी त्यांचा कार्यकाल विनासायास पार पडला. पुण्याला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठीचे टेंडर त्यांच्याच कालावधीत निघाले. यासाठी खुल्या बाजारातून पुणे महापालिकेने दोनशे कोटी रूपये हे खुल्या बाजारातून उभे केले. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. ही निविदा जादा दराने वादात अडकली खरी. मात्र त्यातूनही कुमार यांनी मार्ग काढला. 

पुण्यात त्यांच्या जागी कोण येणार, याकडे आता अनेकांची लक्ष आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव हे या पदावर येण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जाते. अनुभवी व प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी पुणे पालिकेवर नेमला जातो. त्यामुळे राव यांना येथे संधी मिळेला का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सौरभ राव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात.

पुण्यातील आपल्या कार्यकालाबद्दल कुमार यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुण्यात अनेक बाबी नव्याने शिकायला मिळाल्या. पुणेकरांचे सहकार्य मिळाले, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  
 

संबंधित लेख