kumarswami attack bjp, 100 crore offer to jds mla | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

जेडीएस आमदारांना शंभर कोटींची ऑफर, कुमारस्वामींचा भाजपवर आरोप 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

नवी दिल्ली : कर्नाटकातील निकालवर मी समाधानी नाही. मोदी लाट नसून त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही असे स्पष्ट करतानाच भाजपकडून जेडीएस आमदारांना शंभर कोटींची ऑफर देण्यात आल्याचा गंभीर आरोप आज जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला. 

नवी दिल्ली : कर्नाटकातील निकालवर मी समाधानी नाही. मोदी लाट नसून त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही असे स्पष्ट करतानाच भाजपकडून जेडीएस आमदारांना शंभर कोटींची ऑफर देण्यात आल्याचा गंभीर आरोप आज जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला. 

देशातील अन्य राज्यांमध्ये भाजपाने जे केले त्यानुसार कर्नाटकमध्ये त्यांना सत्तास्थापनेचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. गोवा, मणिपूरमधील भाजपाच्या सत्तास्थापनेसंदर्भात ते बोलत होते. मी मुख्यमंत्रीपदाच्या मागे धावत नाही. पण आम्ही कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी आवश्‍यक असलेला बहुमताचा आकडा ओलांडला आहे, असा दावाही कुमारस्वामी यांनी केला. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस-जेडीएसकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही पक्षांकडून बहुमतासाठी असलेली 'मॅजिक फिगर' जुळविण्याचे प्रयत्न केले जात असताना कॉंग्रेस आणि भाजपचे नेतेही आक्रमक बनले आहेत. आमच्या दहा आमदार फोडले तर आम्ही भाजपचे वीस आमदार फोडू शकतो असा दावाही कुमारस्वामी यांनी केला . 

कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसने राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. कुमारस्वामी म्हणाले, "'ऑपरेशन कमल' हे यशस्वीपणे होण्याचे विसरा. जे लोक भाजपला सोडू इच्छितात त्यांनी आमच्याकडे यावे. आम्ही राज्यपालांना सांगत आहोत, घोडेबाजाराला वाव मिळू नये असा निर्णय देणे टाळावे. राज्यपाल वाला यांची आम्ही भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे''. 

''आम्हाला दोन्ही बाजूंनी 'ऑफर' आली आहे. मी हे किरकोळ समजत नाही. 2004 आणि 2005 मध्ये भाजपसोबत जाणे हा माझ्या वडिलांच्या राजकारणातील 'काळा डाग' आहे. त्यामुळे आता देवाने हा 'डाग' काढण्याची संधी मला दिली आहे. त्यामुळे मी आता कॉंग्रेससोबत जाणार आहे'', असेही कुमारस्वामी म्हणाले.

संबंधित लेख